साहित्याचा एकाकी/एकटा आवाज
मी आता आपल्यासमोर जे काही मांडणार आहे ते एका टीकाकाराच्या किंवा व्यावसायिक समीक्षकाच्या दृष्टिकोणातून नव्हे वा एखाद्या अॅकॅडेमिक प्रोफेसरच्या दृष्टिकोणातूनही नव्हे. तो आहे एका लेखनकर्मीचा दृष्टिकोण, ज्याच्यासाठी साहित्य हे गेली चाळीस-पन्नास वर्षे एक आसऱ्याचे ठिकाण, निवारा-आणि दुःख आणि वेदनांच्या क्षणी परमशांती आणि सांत्वना देणारा असा एक चिरतन स्रोत राहिलेले आहे. फॉकनरने कुठेतरी असे म्हटलेले आहे …